एका समावेशी परिस्थितीक व्यवस्थेच्या दिशेने आमचे पहिले पाऊल: Accel Atoms वेबसाइटवर अनेक भाषांना समर्थन दिले जात आहे
121+ भाषा
19,500+ बोलीभाषा
140,00,00,000+ लोकं
भारताच्या अनेक लोकसंख्येमुळे तसेच अनेक भाषा व बोलीभाषांमुळे भारत एक नानाविध देश आहे.
गेल्या तीन वर्षांत, आम्हाला भारतभरातील हजारो संस्थापकांशी बोलण्याचे आणि विविध क्षेत्रांमध्ये व भौगोलिक भागांमध्ये निर्मिती करण्याचे भाग्य लाभले आहे.
आम्हाला एक मूलभूत सत्य शिकायला मिळाले आहे आणि ते आहे की संस्थापक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसेच कोणतेही दोन संस्थापक एकसमान नसतात. यात महत्त्वाचे असे की, देशभरात उद्योजकता फुलत असताना त्यास विशिष्ट भाषा किंवा बोली भाषा जाणून घेण्याचे अडथळे जाणवत नाहीत.
नीरज सिंग, जे स्पिन्नीचे संस्थापक आहेत, याचे एक मोठे उदाहरण आहेत. ते झारखंडमधील डाल्टनगंज येथे लहानाचे मोठे झाले आणि एका हिंदी माध्यम शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. नीरजनी आयुष्याचा बराचसा काळ लोटल्यावर इंग्रजी शिकायला सुरुवात केली आणि भाषा त्यांच्यासाठी कधीही अडचण नव्हती किंवा भाषेमुळे ते कधीही मागे राहिले नाहीत!
आज स्पिन्नी वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात (युज्ड कार मार्केटमध्ये) आघाडीवर असून, भारतभरात दोन लाखांहून अधिक ग्राहक आहेत.
अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील जिथे संस्थापकांनी भाषेच्या अडथळ्यांवर मात केली आहे आणि पुढे जाऊन मोठ्या गोष्टींची निर्मिती केलेली आहे. मग प्रश्न उरतो तो असा, "भाषा कोणतीही असली तरी सुद्धा सर्वोत्तम संस्थापकांना आणि त्यांच्या कल्पनांनासमर्थन बनविणाऱ्या परिस्थितीक व्यवस्थेची निर्मिती आपल्याला कशी करता येईल?"
समावेशनाची सुरुवात पायापासून होते आणि भारतातील कोणासही वाचता येईल आणि समजू शकेल अशी वेबसाइट तयार करणे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
आज आम्ही बीटामध्ये इंग्रजी व्यतिरिक्त खाली दिलेल्या पाच नवीन भारतीय भाषांमध्ये Accel Atoms वेबसाइट सादर करत आहोत:
- कन्नड
- मराठी
- हिंदी
- तमिळ
- तेलुगु
Accel Atoms बीटामध्ये नेहमीच चिरस्थायी स्वरूपात असते आणि आमचे नवीन अनेक भाषांना समर्थन देणारे वैशिष्ट्य भारतातील सर्व संस्थापकांसाठी समावेशी परिस्थितीक व्यवस्थेची निर्मिती करण्याच्या दिशेने टाकलेल्या अनेक पावलांमध्ये पहिले पाऊल आहे. हे उपयुक्त वाटेल अशा एखाद्या संस्थापकाला आपण सांगितले तर आम्ही आपल्याप्रति कृतज्ञ राहू.
वेबसाइटच्या सर्वांत वरच्या बाजूला भाषेचे टॉगल दिलेले आहे. कृपया याचा वापर करून लगेच ते करून पहा आणि कोणताही अभिप्राय असल्यास आम्हाला तो कळवा.
Accel Atoms, समुदाय कार्यक्रम आणि त्याच्या पोर्टफोलिओ कंपन्यांच्या बाबतीत अपडेटेड रहा