Asets
ASETS-CA Inc यांनी सादर केला AI-संचालित एक स्वतंत्र, अशा प्रकारचा पहिला क्लाउडवर आधारित इंटिग्रेटेड डिझाइन सूट™ (IDS™)
ASETS-CA Inc यांनी AI-संचालित एक स्वतंत्र, अशा प्रकारचा पहिला क्लाउडवर आधारित इंटिग्रेटेड डिझाइन सूट™ (IDS™) सादर केला आहे. IDS™ हा एक बहुविद्याशाखीय CAD, सिम्युलेशन आणि अभियांत्रिकी डिझाइन प्लॅटफॉर्म आहे जो अभियांत्रिकी खरेदी बांधकाम (EPC) आणि अंतिम मालक कंपन्यांना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील अभियांत्रिकी 10 पट वेगाने पुढे नेण्यास मदत करते. IDS™ वापरणाऱ्या ग्राहकांना अभियांत्रिकी साधनस्रोतांच्या जलद उपयोजनाचा फायदा होतो आणि अभियांत्रिकी प्रकल्पांशी संबंधित मेहनत आणि खर्च कमी होतो. ASETS कॅनडा कार्यालय IDS™ च्या विक्री आणि विकास क्षमतेवर लक्ष केंद्रित करते
Check them out
Meet the Founder
CEO, ASETS
अश्विनी ओक या पेट्रोकेमिकल आणि रिफायनरी क्षेत्रातील 22 वर्षांचा अनुभव असलेल्या एक स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत आणि त्यांच्या कॉम्प्युटेशनल मेकॅनिक्समधील संशोधनामुळे त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातील अभियांत्रिकी बाजारातील अंतर ओळखण्यात मदत झाली. सातत्याने बहुविद्याशाखीय बदल न होता सर्वसमावेशक पर्याय प्राप्त करणे हे अंतर आहे जे दूर करणे त्यांना गरजेचे वाटले. यामुळे IDS-सर्वसमावेशक डिझाइन सूटला प्रोत्साहन मिळाले. एक बहुविद्याशाखीय 3D CAD सिम्युलेशन आणि डिझाइन इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म ज्यामध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स बदलता येतील आणि अंतिम मालक आणि अभियांत्रिकी कंत्राटदार दोघांनाही जलद आणि कसून अंदाज तयार करण्यात मदत करेल आणि मार्जिन मॉनेटायझेशनवर प्रभावी नियंत्रण ठेवेल.